Rain Alert News : राज्यातील वातावरणात बदल झाल्यामुळे पुढील ४८ तासांत राज्यात पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचा राज्यातील वातावरणावर बदल झाला आहे. यामुळे राज्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या काही भाागातील तापमानात चढ-उतार सुरु आहे.
राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज (ता.६) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलीय. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील वातावरणात बदल झाल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. थंडीचा कडाका देखील कमी झाला आहे. मुंबई उपनगरात सध्या ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा कडाका देखील कमी झाला आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे.
आज (दि.६) आणि उद्या कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर भारतात थंडीची लाट असल्याने राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसंच उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीच्या कडाक्याबरोबर दाट धुक्याची चादर देखील पाहायला मिळाली.
Share your comments