Rain Update In Maharashtra : देशात ३१ मे ला मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यापूर्वी आठवडा भरापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यासोबतच राज्यातील तापमानात देखील सातत्याने चढउतार होताना पाहायला दिसत आहे. यामुळे नागरिक पावसामुळे आणि उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.
राज्यात एकीकडे उकाडा वाढला असल्याने त्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात सतत बदल होत असल्याच पाहायला मिळत आहे. तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यांसह येणाऱ्या या पावसामुळंही नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे. तसंच पावसामुळे शेतपिकांचं देखील नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा व हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या 24 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच हवामान खात्याने या भागात यलो अलर्ट देखील जारी केला आहे. राज्यात येत्या काळात तापमानातीच चढ-उतारही पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Share your comments