Pune News :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील पाच दिवसांत राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर उद्या (दि.५) राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. तर विदर्भात पावसाचा जोर राहील, असंही हवामान खात्याने म्हटले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, अचलपूर, चांदुर बाजार या भागात पावसाचा जोर कमी असेल. अकोला जिल्हा, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर भागात पावसाची शक्यता आहे.
विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना हवामान खात्याने जोरदार पवासाचा अंदाज दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी देखील हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तर बुधवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे.
ईशान्य बंगालच्या उपसागरावर आणि आसपास तयार झालेले चक्रीवादळ आता संपले आहे. वायव्य बंगालचा उपसागर आणि परिसर आणि मध्यम ट्रॉपोस्फेरिक पातळीपर्यंत विस्तारलेला आहे. त्याचा अंतर्गत प्रभाव झाल्यामुळे वायव्य आणि लगतच्या पश्चिममध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अंदमान आणि निकोबार बेटांवर, केरळ वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तेलंगणा, गंगा पश्चिम बंगाल आणि ओडिशा आणि किनारपट्टीवर देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, झारखंडमध्ये पावसाची शक्यता आहे.
Share your comments