मागच्या काही दिवसांपासून पाऊस उघडझाप करत आहे. अशा अवेळीपावसामुळे शेतकऱ्यांच्या (farmers) अनेक पिकांचे नुकसान होत आहे. मात्र सध्या पावसाने उघडीप दिली आहे. काल रात्री मुंबईसह इतर परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
हळूहळू राज्यातील पावसाचा (Rain) जोर कमी होताना दिसत होता. मात्र आता पुन्हा मुंबईत ठीक ठिकाणी पावसाची संततधारा सुरू असताना पाहायला मिळत आहेत. हवामान विभागानं (Meteorological Department) काल विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला. त्यानुसार तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. दरम्यान आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे.
आता CIBIL स्कोअरशिवाय कर्ज मिळणार; एलआयसीची 'ही' योजना शेतकऱ्यांना देतेय मोठी संधी
यामध्ये अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार परतीच्या पावसासाठी राज्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
वायव्य राजस्थान आणि गुरजारच्या कच्छमधून परतीचा पाऊस सुरु झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.
शेतकरी मित्रांनो तंत्रशुध्द पध्दतीने ज्वारीची लागवड करा; मिळेल अधिक उत्पन्न
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट (yellow alert) म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो.
जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
महत्वाच्या बातम्या
'या' ५ राशींचा ठरणार वरदान काळ, धनलाभाची मोठी शक्यता; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
कांद्यापाठोपाठ लसणाच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता; पहा आजचे दर
लाल कंधारी गाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार बनेल; दूध उत्पादनातून मिळतो लाखोंचा नफा
Share your comments