1. इतर बातम्या

पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरवर्षी मिळणार 1 लाख 11 हजार रुपये

पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. आपण पाहिले तर पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Post Office customers

Post Office customers

पोस्ट ऑफिस (post office) हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. आपण पाहिले तर पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिस योजना पैशाच्या हमीसह चांगला परतावा देतात. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये ग्राहकांना दरवर्षी 1,11,000 रुपये मिळत आहेत.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबाबत (Senior Citizens Savings Scheme) माहिती जाणून घेणार आहोत.या योजनेतून गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळतो. या सरकारी योजनेत तुम्हाला ७.४ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. यासोबतच सरकार दर तिमाहीत व्याजदरांचा आढावा घेते. त्यामुळे यामध्ये व्याजाची रक्कमही बदलू शकते.

शेत जमीन खरेदी-विक्रीमध्ये केला मोठा बदल; सरकारच्या निर्णयाने शेतकरी चिंतामुक्त

तुम्ही किती गुंतवणूक करू शकता?

या सरकारी योजनेत चांगल्या रिटर्न्ससोबतच टॅक्स बेनिफिटचाही फायदा आहे. या योजनेत पैसे गुंतवून दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त कसे कमवू शकता हे सांगणार आहोत.

या सरकारी (government) योजनेत तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही त्यातील गुंतवणूक 1000 च्या पटीत वाढवू शकता. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 15 लाखांची गुंतवणूक करू शकता. त्याची मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे, परंतु खातेदार ही योजना आणखी 3 वर्षांसाठी वाढवू शकतात.

'या' औधषी वनस्पतीची एकदाच लागवड करा आणि तीन वेळा कापणी करत कमवा लाखों रुपये

111,000 रुपये असे मिळवा

आयकराच्या 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्हाला मिळणारे व्याज 50,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या सरकारी योजनेत 15 लाख रुपये म्हणजेच जास्तीत जास्त रक्कम जमा केली असेल आणि त्याला 7.4 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत असेल, तर यानुसार त्याला प्रत्येक तिमाहीत 27750 रुपये मिळतील. जर आपण त्याची वार्षिक रक्कम पाहिली तर ती 1,11,000 रुपये होईल.

महत्वाच्या बातम्या 
सरकारकडून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन; 8 लाख बियाणांचे मिनीकिट्सचे शेतकऱ्यांना मोफत वाटप
गव्हाच्या 'या' ३ जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल; फक्त १२० दिवसात देतील तब्बल ९० क्विंटल उत्पादन
25 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या लोकांचे सोनेरी दिवस सुरु होणार; वाचा तुमचे राशीभविष्य

English Summary: Post Office customers 1 lakh 11 thousand rupees every year Published on: 23 September 2022, 11:57 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters