यावर्षी आपण एकंदरीत पावसाची परिस्थिती बघितली तर सुरुवात म्हणजे जून महिन्यात अगदी कमी प्रमाणात पाऊस सगळीकडे झाला. परंतु जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आणि राज्यातील बरीचशी धरणे देखील तुडुंब भरली त्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगल्यापैकी मिटला.
नक्की वाचा:Weather Update: महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाची शक्यता! हवामान खात्याचा अलर्ट जारी
परंतु आता यापार्श्वभूमीवर एक थोडीशी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आली असून ती म्हणजे यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस हा लवकर माघारीचा रस्ता धरणार असून सर्वसाधारण तारखेपेक्षा सुमारे पंधरा दिवस आगोदर माघारीच्या टप्पात दाखल व्हायची शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे.जर आपण एकंदरीत मान्सून माघारी परतण्याचा तारखेचा विचार केला तर ती सामान्यतः17 सप्टेंबर ही आहे.
परंतु 1 सप्टेंबर पासून जो काही पहिला आठवडा सप्टेंबर चा सुरू होईल त्यामध्ये वायव्य भारतातील काही भागांमधून मान्सून परत फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजात म्हटले आहे.
संपूर्ण देशाचे पावसाचे प्रमाण
जर आपण यावर्षी मान्सूनच्या पावसाचा विचार केला तर संपूर्ण देशात सरासरीपेक्षा नऊ टक्के जास्त पाऊस झाला आहे परंतु उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यामध्ये जर
आपण दीर्घ कालावधीचा सरासरीचा विचार केला तर 40 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दिल्लीमध्ये 28%, बिहारमध्ये 41 टक्के आणि त्रिपुरा आणि झारखंड मध्ये प्रत्येकी 26% पाऊस कमी झाला आहे.
नक्की वाचा:शासनाचा अजब कारभार! चक्क येड्या बाभळीच्या झुडपात लावलंय पर्जन्यमापक यंत्र
Share your comments