यावर्षी आपण एकंदरीत पाहिले तर जून महिन्यात जेव्हा पावसाची सुरुवात झाली तेव्हा संपूर्ण भारतामध्ये पावसाने हव्या त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. परंतु त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. जर आपण या वर्षी मान्सूनचा पूर्ण हंगामातला एकंदरीत कोटा पाहिला तर तो तेरा दिवस आधीच पूर्ण झाला आहे.
जर आपण एकंदरीत पाहिले तर मान्सूनच्या शेवटच्या दिवशी 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण देशात 868 मिमी पाऊस होणे अपेक्षित असते परंतु ही आकडेवारी पावसाने तेरा दिवस आधीच म्हणजेच 17 सप्टेंबरला पूर्ण केली. म्हणजे आता 17 सप्टेंबर नंतर जो काही पाऊस होत आहे तो एकंदरीत पावसाच्या कोट्यापेक्षा जास्त म्हणून नोंदला जाईल.
यावर्षी मान्सूनचे वितरण
मान्सूनचे वितरण पाहिले तर ते असमान होते. उत्तर भारताचा विचार केला तर त्याठिकाणी एकूण सरासरीपेक्षा 4 टक्क्यांपर्यंत कमी तर दक्षिणेत 30 टक्के अधिक पाऊस झाला आहे. आपल्याला माहित आहेच कि प्रत्येक वर्षाला मान्सून जेव्हा परतीचा प्रवास सुरू करतो तो 17 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानच्या पोखरण मधून करतो. परंतु यावर्षी मान्सूनचा हा प्रवास 23 सप्टेंबर पर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
जर या बाबतीत हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यांच्यामध्ये सलग पाच दिवस पावसासंबंधी वातावरणातील हालचाली बंद राहिल्या व ढग विखुरलेले आहेत तसेच पूर्वेकडील वाऱ्या ऐवजी कोरडे वारे पश्चिमेकडून वाहू लागले म्हणजे हवेतील बाष्प कमी झाले की या मोसमातील मान्सून अर्थात मोसमी पाऊस पूर्णपणे परतला असे मानले जाते.
परंतु यावर्षी बंगालच्या उपसागरामध्ये नऊ ते दहा सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुन्हा पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली व या परिस्थितीमुळे पूर्व,मध्य पश्चिम भारतात पुन्हा एक आठवडा मान्सून सक्रिय राहिला.
अजून देखील बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे स्थिती कायम असून आता हे क्षेत्र पश्चिमेच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्यामुळे तसेच राजस्थान मध्ये देखील दुसरे एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून
यामुळे कदाचित बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल रोखली जाऊ शकते. यामुळेच भारतातील काही राज्यात जसे की पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील बऱ्याच भागांमध्ये 20 सप्टेंबर पासून पुढील दोन-तीन दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Share your comments