Weather Update :
राज्यात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. या आगमनाला राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचे चित्र आहे. रायगडसह संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये पाऊस मनमुराज बरसताना दिसणार आहे.
आज मंगळवारी कोकणात, मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांमध्ये राज्यातील ५ जिल्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे.
मुंबई, पुणे, पालगर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये काही प्रमाणात पावसाची विश्रांती असणार आहे. कोकणातील घाटमाथ्यावरील भागामध्येही पावसाची दमदार हजेरी असणार आहे. सातारा आणि कोल्हापूर घाटमाध्यावरही अशीच परिस्थिती असेल.
पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगालच्या खाडीकडे सरकला आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यातील ५ जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे.या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Share your comments