Maharashtra Rain: आता पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे. (Maharashtra Rain) महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आत्ता सध्या बरसणारा पाऊस परतीचा नाही अशी अत्यंत महत्त्वाची माहितीही पुणे हवामान विभागाने दिली आहे.
येवढेच नाही तर तुम्ही त्याच्या परतीची वाट पाहत, असाल तर किमान सध्यातरी तशी काही अपेक्षा ठेवू नका. कारण, पुढचे 2 दिवस पुण्यासह (Pune Rain) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्यातरी पावसानं परतीची वाट धरली असं तुम्हाला वाटत असल्यास तो मोठा गैरसमज असेल.
लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, शेतकऱ्यांनी पिके केली नष्ट
दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस इशारा दिला आहे.
तर मराठवाडा भागात आज 12 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज 12 आणि उद्या 13 सप्टेंबर हे तीन दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय. (IMD Alert)
कृषी विद्यापीठाकडून नवीन ट्रॅक्टरचलित यंत्र लॉन्च; अशाप्रकारे करा उसातील आंतरमशागत
Share your comments