रविवारपासूनच राज्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पहाटेपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसानं (rain) हजेरी लावली आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची रिमझिम सुरू आहे.
मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने (Department of Meteorology) वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज खात्याने वर्तविला आहे.
तसेच कोकणातही मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातही पूर्व विदर्भातही मुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे.
LIC आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर
पावसाचा जोर 'या' ठिकाणी वाढणार
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (area intense low pressure) आता वादळात रूपांतरीत झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील एक-दोन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मागील काही दिवस उघडीप घेणारा पाऊस आता रविवारपासून एकदा सक्रीय झाला आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच पूर्व मराठवाड्यात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
या आठवड्याच्या शेवटी मान्सूनचा उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा राज्यात पाऊस विश्रांती घेणार अशी शक्यता आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर 'या' जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.
व्यवसाय करायचाय पण भांडवल नाही बोलणारांसाठी ही बातमी! आता शेळी पालनासाठी मिळणार 4 लाख रुपये...
या ठिकाणी जोरदार पाऊस
घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी या परिसरात जोरदार पाऊस असणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारपासुन पाऊस विश्रांती घेईल. मात्र या काही ठिकाणी हलका पाऊस (rain) राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
'या' राशीच्या लोकांना कामात मिळणार भरभरून यश; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मत्स्यपालकांनो आता ऑनलाइन ताजे मासे खरेदी विक्री करा; सरकारने केले 'एक्वा बाजार' अँप लाँच
Agricultural Business: शेतकऱ्यांनो 'हे' 3 व्यवसाय शेतीमधून करा; कमी खर्चात मिळेल लाखोंचा नफा
Share your comments