परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे (rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने सवधानतेचा इशारा दिला आहे.
काल विदर्भाच्या अनेक भागातून मॉन्सून (Monsoon) माघारी फिरला आहे. पुढील 36 तासांत मॉन्सून देशातून निघून जाणार असल्याची माहिती काल पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. परंतु 24 तारखेच्या दरम्यान समुद्र किनारी चक्रिवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सोयाबीन, भुईमूग, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तसेच 25 तारखेला चक्रीवादळ आंध्र आणि ओरिसा किनारपट्टीपासून पश्चिम बंगाल, बांग्लादेशकडे जाणार. तर महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम होणार नाही अशी माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आज आणि उद्या कोकण भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण रहाणार असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते? जाणून घ्या अहवाल
सध्या अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दबाचे क्षेत्र आहे, तीन ते चार दिवसात ते तीव्र होणार आणि ते होताना त्याचा प्रवास किनारपट्टीच्या भागाकडे होण्याची शक्यता आहे. सोमवारच्या आसपास ते चक्रिवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर २५ तारखेला ते किनारपट्टीला लागून पश्चिम बंगाल, बांग्लादेशाकडे जाण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. दरम्यान राज्यात या वादळामुळे कुठलाही इशारा हवामान विभागाने दिला नाही, असे होसाळीकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
देशी बटाट्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; 'या' पद्धतीचा वापर केल्यास मिळणार दुप्पट उत्पन्न
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर; सोयाबीन पिकासाठी तब्बल ४० कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर
धक्कादायक! बनावट खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल
Share your comments