1. कृषीपीडिया

धक्कादायक! बनावट खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन खतांचा वापर करीत असतात. ज्यामधून चांगले उत्पादन मिळेल. मात्र खते खरेदी करताना काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बनावट खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी नवनवीन खतांचा (fertilisers) वापर करीत असतात. ज्यामधून चांगले उत्पादन मिळेल. मात्र खते खरेदी करताना काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बनावट खतांची विक्री (Sale of spurious fertilisers) करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

लिंगदेव येथील आशुतोष ठका शेटे यांच्या दुकानातून शेतकरी सोमनाथ अंकुश चौधरी यांनी 10ः 26ः 26 खत घेतले. या खताबाबत त्यांना शंका आली. यासंदर्भात त्यांनी कृषी अधिकारी (Agricultural Officer) यांच्याकडे संशय व्यक्त केला. कृषी अधिकार्‍यांनी शेतकऱ्याला खते न वापरता तसेच ठेवण्यास सांगितले.

यानंतर कृषी अधिकार्‍यांनी चौधरी यांना खताच्या बिलाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी आर्द्रतो अ‍ॅग्रो फार्मस इंडिया पी.व्ही.टी. लि. यांचे बिल दाखवले. त्या बिलावर 10ः 26ः 26 या खताचे पुढील पक्क्या बिलावर नोंद न करता पाठिमागे पेनने लिहिलेले होते.

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! सरकार दिवाळीला स्वस्त दराने डाळींची विक्री करणार

कृषी अधिकार्‍यांचा संशय वाढल्याने त्यांनी दुकानदार आशुतोष ठका शेटे यांना सोमनाथ चौधरी यांचे घरी बोलावुन घेतले. खताबाबत विचारपुस केली असता तो उडवा- उडवीचे उत्तर येऊ लागली. त्यामुळे सदर खताचे गोणीचा पंचनामा केला.

खतामधून अंदाजे 400 ग्रॅम वजनाचे तपासणी करता सॅम्पल (sample) वेगवेगळे काढून गोणी सील केली. खताचे सॅम्पल पुणे येथील प्रयोग शाळेत पोस्टाने पाठवून दिले. पंचायत समितीचे तालुका कृषीअधिकारी सचिन देवराम कोष्टी यांच्या फिर्यादीवरून दुकानदार आशुतोष ठका याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तु सेवा अधिनीयमाचे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आणखी तपासणी सुरूच आहे.

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; या जिल्ह्यात लम्पीने 10 जनावरांचा मृत्यू तर 110 जनावरे बाधित

गुन्हा दाखल

लिंगदेव येथील आर्द्रतो अ‍ॅग्रो फार्मस इंडिया या नावाच्या कृषी सेवा केंद्रात बोगस खताचे प्रकरण आढळून आले. त्यासंदर्भात रासायनिक खत आदेश 1985 तर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांची कृषी सेवा केंद्राकडून फसवणूक झाल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच बनावट खते, बियाणे विक्री करणार्‍यांबाबत शेतकर्‍यांनी संपर्क साधावे, असे आव्हान जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक किरण मांगडे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 
दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना दिलासा; 'या' जिल्ह्यातील 55 हजार शेतकऱ्यांना 200 कोटींचे प्रोत्साहन अनुदान
कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते? जाणून घ्या अहवाल
परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सोयाबीन, भुईमूग, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

English Summary: registered against operator agricultural center selling fake fertilisers Published on: 21 October 2022, 02:11 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters