Panjabrao Dakh: राज्यात पाऊस (Rain) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने (Monsoon) जोरदार हजेरी लावली आहे. (Monsoon News)
पंजाबराव यांचा पावसाचा अंदाज
पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात 18 सप्टेंबरपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण आहे. राज्यात 18 सप्टेंबर पर्यंत अनेक विभागात पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबरावं यांनी सांगितले आहे.
पंजाबरावांच्या मते, राज्यातील अनेक जिल्ह्यात भाग बदलत या कालावधीत पाऊस पडणार आहे. तसेच या कालावधीत कोसळणारा पाऊस विजांच्या कडकडाटासह कोसळणार असल्याने शेतकरी बांधवांना काळजी घेण्याचे आवाहन देखील या वेळी पंजाबराव डख यांनी केले आहे.
अतिवृष्टीची शक्यता
राज्यात अतिवृष्टी होणार असल्याने शेतकरी बांधवांची चिंता देखील वाढणार आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या मते 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे.
यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना हे तीन दिवस विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. निश्चितच राज्यात 18 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.
धक्कादायक! सायरस मिस्त्री यांच्या अपघातामागील मोठं कारण आलं समोर...
पंजाबराव यांच्या मते, या कालावधीत कोसळणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कोसळणार असून अनेक ठिकाणी विज पडण्याच्या घटना देखील घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची या कालावधीत विशेष काळजी घ्यावी.
आनंदाची बातमी: आता आंबा वर्षभर टिकवता येणार; तंत्रज्ञान विकसित
Share your comments