1. कृषीपीडिया

आनंदाची बातमी: आता आंबा वर्षभर टिकवता येणार; तंत्रज्ञान विकसित

आंबा म्हणजे फळांचा राजा...आणि हापूस या आंब्यामधला महाराजा... याच हापूस आंब्या बाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकणातील जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्याची (Hapus Mango) चव आता वर्षभर चाखता येणार आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Mango

Mango

आंबा म्हणजे फळांचा राजा...आणि हापूस या आंब्यामधला महाराजा... याच हापूस आंब्या बाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकणातील जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्याची (Hapus Mango) चव आता वर्षभर चाखता येणार आहे.

आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये वर्षभर टिकणार

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील नेमळे गावातील आंबा व्यावसायिक गुरुप्रसाद नाईक (Guruprasad Naik) यांनी ही किमया साधली आहे. त्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये नैसर्गिकरित्या पिकलेलल्या आंब्याची साठवणूक केली आहे. त्यामुळं वर्षभर हवा तेव्हा आता हापूसची चव चाखता येणार आहे.

नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये विशिष्ट तापमानाला साठवून ठेवला तर तो वर्षभर टिकतो. त्यासाठी गुरुप्रसाद नाईक यांनी गेली दोन वर्ष प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे.

अशा प्रकारे हापूस आंबा साठवून ठेवल्यानंतर देखील त्याची चव आणि रंगात कोणताही फरक पडत नाही. गुरुप्रसाद नाईक यांनी मे महिन्यात कोल्ड स्टोरेजमध्ये आंबा ठेवून ऐन गणपती सणाला आंबा विक्री गणेशभक्तांना उपलब्ध करुन दिला आहे. 3 महिने मिळणारा देवगड हापूस आता गणेशोत्सवात मिळत असल्यानं गणेशभक्त आनंदी झाले आहेत.

कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन फेबुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, हा आंबा स्टोरेज सिस्टिम नसल्याने आंबा सिझन संपला की आंबा मिळत नाही.

मात्र अशा पद्धतीने कोल्ड स्टोरेज सिस्टीम उपलब्ध झाली आणि नैसर्गिकरित्या आंबा उपलब्ध करण्यासाठी अत्याधुनिक पद्धत वापरली तर भविष्यात वर्षभर कोकणातील हापूस देशभरातील आंबे खवय्यांना चाखता येणार आहे.

हेही वाचा: IMD Alert: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; या भागात यलो अलर्ट

डझनाला 1 हजार 200 रुपयांचा दर

डझनाला किमान 1 हजार 200 रुपयांचा दर मिळत असल्याने चांगला फायदा होत असल्याचे गुरुप्रसाद नाईक यांनी सांगितले. परंतु कोल्ड स्टोरेजसाठी मोठ्या प्रमाणात लाईट बिल येते, हे परवडणारे नाही.

बऱ्याचवेळा लाईट गेल्यास जनरेटरचा वापर करावा लागतो. शासनाने सबसीडी दिल्यास आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा प्रयोग कोकणात नक्की यशस्वी होईल.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या-कोणत्या दिवशी DA वाढीची घोषणा होणार..

लाडक्या बाप्पाला कोकणच्या हापूस आंब्याचा नैवद्य

कोकणातला आवडता सण म्हणजे गणेश चतुर्थी. हजारो चाकरमानी या सणाला कोकणात दाखल झाले आहेत. गणेश चतुर्थीत आपल्या लाडक्या बाप्पाला कोकणचा फळांचा राजा असलेला हापूस आंबा नैवद्य म्हणून ठेवला जातो आहे. तर काही जण आबा ज्युस, आंब्याचं रायत बनवून त्याची चव चाखली जात आहे.

आजपासून मोठे बदल..! शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार प्रभाव.. घ्या जाऊन

English Summary: Now mangoes can be preserved throughout the year; Technology developed Published on: 04 September 2022, 03:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters