गेल्या काही वर्षात शेतीमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. तसेच शेतकऱ्यांवर अनेक संकटे देखील येत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक परिस्थितीत सापडला आहे. यामध्ये आता शेतीमध्ये अनेक बदल करणे गरजेचे आहे. आता याबाबत हवामान तज्ञ पंजाबराव डख माहिती दिली आहे. आता निसर्गावर आधारित शेती हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतामध्ये पर्जन्यमानात अनिश्चितेचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती न करता त्याचा अंदाज पाहूनच शेतीमध्ये बदल केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे पण निसर्गाचा अडथळा होत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे शेतकऱ्यांचा उद्देशही साध्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता पीक पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतचा अभ्यास करुनच उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वाढत असल्याने उत्पादन वाढणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती न करता त्याचा अंदाज पाहूनच शेतीमध्ये बदल केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. शेती आहे म्हणून करण्यात अर्थ नाही. तर पीक पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतचा अभ्यास करुनच उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे. तरुणांनी यामध्ये पुढे येणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता कोकणात शेतकऱ्यांसाठी पर्वणी, पहिल्यांदाच भरणार भव्य कृषी प्रदर्शन, 'असे' असणार स्वरूप
बातमी कामाची! सोयाबीनसाठी 53 हजार तर उसासाठी 1 लाख 38 हजार रुपये कर्ज; पीककर्जाची प्रक्रिया सुरु
साखर कारखान्यांबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले ज्यांच्यात धमक असेल त्याने..
Share your comments