
Temperature update news
Pune News : देशभरातून मान्सून परतीचा प्रवास सुरु आहे. हवामान देखील कोरडे आहे. यामुळे राज्यात आता ऑक्टोबर हिटचा तडका जाणवू लागला आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने उत्तरेकडील काही राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवत आहे. यामुळे मुंबई पुण्यासह इतर भागात देखील उकाडा जाणवत आहे. विदर्भातील तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका वाढला आहे. यामुळे नागरिकांना आता घाम फुटू लागला आहे. विदर्भात बहुतांश भागात उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झालेत.
तापमान वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु आहे. किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे.
येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर हवामानात बदल होण्याचीही शक्यता आहे. आता ऑक्टोबर हिटचे चटके जाणवणार आहे.
Share your comments