
Weather Update News
Rain Update :
देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. त्यातच राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि पुण्यातही पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तसंच राज्याच्या अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील हवामान खात्याने पावसाचा इशारा जारी केला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पुढील ३ दिवस राज्याच्या विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
राज्यात उद्या (दि.२७) बुधवारी कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. राजस्थानमधून काल (दि.२५) पासून परतीच्या मान्सूनने सुरुवात केली आहे. यामुळे आगामी काळात राज्यात पावसाची शक्यता आहे.
राजस्थानमधून परतीच्या मान्सूनचा अर्थातच नैर्ऋत मोसमी वाऱ्याने प्रवास सुरु केला आहे. दरवेळी राजस्थानमधून परतीचा मान्सून (monsoon return update) १७ सप्टेंबरपासून सुरु करतो पण यंदा ८ दिवस उशिराने हा प्रवास सुरु झाला आहे. काल (दि.२५) पासून मान्सूनने परतीच्या प्रवासा सुरुवात केली आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.
दरम्यान, मान्सून प्रवास सुरु झाला असला तरी राज्यात अद्यापही मान्सून सक्रीय आहे. महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज (दि.२६) सप्टेंबर रोजी धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट जारी केला आहे.कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठाही वाढला आहे.
Share your comments