Weather Update : देशातील नागरिकांना आता उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. २ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. यामुळे केरळमध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. सुरुवातीला ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती देण्यात आली होती. पण बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मान्सून पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सूने लवकर आगेकूच केली.
अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच १९ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून हळूहळू पुढे सरकत होता. परंतु रेमल चक्रीवादळाने मान्सूनला पुढे सरकण्यासाठी वेग दिला. आणि मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला. दरवेळी मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होत असतो. परंतु यंदा दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. तसंच देशभरात यंदा चांगला मान्सून असणार आहे. सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला.
गतवर्षी देशात कमी पाऊस झाल्यामुळे यंदा सर्वत्र भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पण आता केरळात मान्सून दाखल झाल्याने मान्सून लवकरच देश व्यापले. यामुळे सर्वत्र पाऊस होऊन नागरिकांची पाण्यासाठी वणवण टळली जाईल. हवामान विभागानं नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केला आहे. फक्त केरळच नव्हे तर आज (दि.३०) रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागातही प्रवेश केला आहे.
Share your comments