Rain News :
पश्चिम राजस्थानमधून २५ सप्टेंबरनंतर परतीचा मान्सून माघारी निघण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसंच आज आणि उद्या राज्यात हवामान खात्याने पावसाचा देखील अंदाज व्यक्त केला आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
सध्या राज्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहे. त्यातच हवामान खात्याने परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाण्याअभावी अनेक भागातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तर त्यातच हवामान खात्याने परतीच्या मान्सूनचा अंदाज दिला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
राज्याच्या बहुतांश भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक भागात जोरदार पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर आज दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ सुरु होता. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.
राज्याच्या बहुतांश भागाने उद्या (दि.२३) रोजी हवामान खात्याने यलो पावसाचा अलर्ट दिला आहे. विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमवरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मराठवडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील,असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
पुणे जिल्ह्यात देखील आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर जिल्ह्याच्या बहुतांश पाऊस झाला आहे. तसंच पुणे शहरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे काही काळ नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
Share your comments