Monsoon News : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी हवामान बदल जाणवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
22 ते 24 मे दरम्यान वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस महाराष्ट्रात विदर्भात पडेल. त्याचवेळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही पाऊड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. हा मान्सून पुढे सरकत आहे. काल मान्सूनने बंगालचा उपसागर व्यापण्यास सुरुवात केली आहे.
मान्सून बंगालचा सागर पार करुन कर्नाटकात पोहोचण्यास एक आठवड्यांचा कालवधी लागण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झालाय. अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल दिसून येत आहे. मान्सून पुढे सरकत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेय.
दिलासादायक! या शेतकऱ्यांच्या मुलांना स्वस्तात कर्ज मिळणार, परतफेडीचा कालावधी 10 वर्षे
महाराष्ट्र राज्यात विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात उष्णतेचा झळा जाणवणार आहेत. कोकणात उन्हाचा कहर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, विदर्भात 22 ते 24 मे दरम्यान पाऊस, तर उर्वरित राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. तर उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने मध्य प्रदेशातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
कामाची बातमी! या नंबरवर मिसकॉल द्या अन् मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा, सरकारचा मोठा निर्णय...
Share your comments