Weather News : यंदाच्या पावसावर अल निनोचा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात कमी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आगामी पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच १९ ऑक्टोबर रोजी मान्सूनने देखील देशातून माघार घेतली असल्याची माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे. यंदा देशात ४ महिने ११ दिवस मान्सून होता.
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी परतणारा पाऊस यंदा १९ ऑक्टोबर रोजी देशातून परतला आहे. त्यानंतर परतीच्या पावसाने राज्यासह आणि देशात दिलासा दिलेला नाही. यामुळे यंदा राज्यातील धरणासाठी देखील कमी आहे. त्यामुळे यंदा पाण्याचे नियोजन योग्य करावे लागणार आहे.
रब्बी हंगामावर होणार परिणाम
देशात यंदा सरासरी पावसाने कमी हजेरी लावली आहे. देशात पावसाची सरासरी ८६८.६ मिमी आहे. परंतु यंदा ८२० मिमीच पाऊस झाला. त्यामुळे आता कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणावणार आहे. तसंच धरणासाठा देखील कमी प्रमाणात आहे. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामावर देखील पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मान्सूनची वाटचाल कशी होती
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले. केरळमध्ये ८ जूनला मान्सून आला. त्यानंतर ११ जूनला तळकोकणात दाखल झाला. मात्र पुढील वाटचाल झाली नसल्याने वाट पाहावी लागली. २३ जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू झाली आणि २५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला.
दरम्यान, मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात जून आणि जुलै महिन्यात पावासाने हजेरी लावली. मात्र ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यातील काही दिवस पावसाने खंड दिला. यामुळे सगळ्यांना परतीच्या पावसाची आशा होती. परंतु परतीचा पाऊस देखीला झाला नाही. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
Share your comments