सध्या पावसाने राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. काल गुरुवारी नाशिकमध्ये सलग दीड तास पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. यामुळे शेतकऱ्यांच्या (farmers) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली काही पिके पावसाने वाहून गेली असल्याने शेतकरी दिवाळी आनंदाने साजरी कशी करणार याकडे लक्ष लागले आहे.
मान्सून परतीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत पावसाने (rain) जोर धरलेला पाहायला मिळत आहे. वारंवार पावसाच्या आगमनामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. विशेषता मका पिकाचे नुकसान झाले असून शेतातच पडलेली कणसे पावसाने पूर्णतः भिजून गेली आहेत. काहींच्या शेतातील कणसेही पाण्याबरोबर वाहून गेली असल्याने चारा आणि कणसांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तब्बल 10 लाख शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम रखडली; शेतकरी प्रतीक्षेत
मका पिकासोबतच सोयाबीन, भुईमूग, कांदा, कांदा रोपे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषता शेतकऱ्यांनी मागील वर्षी चाळीत साठवून ठेवलेला कांदा आतापर्यंत ठेवण्यात आल्याने हा कांदा सडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंददायी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
शेतकऱ्यांची कांद्याची (onion) रोपे देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत. महत्वाचे म्हणजे गुरुवारी (दि.20) झालेल्या पावसामुळे मक्याच्या पिकाची कापणी झाल्यांनतर नुकसान झाल्याने पुन्हा पंचनामे करण्याची सरकारकडून मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; या जिल्ह्यात लम्पीने 10 जनावरांचा मृत्यू तर 110 जनावरे बाधित
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! सरकार दिवाळीला स्वस्त दराने डाळींची विक्री करणार
आनंदाची बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरुवात
Share your comments