1. सरकारी योजना

Crop Insurance: तब्बल 10 लाख शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम रखडली; शेतकरी प्रतीक्षेत

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना राबविली जाते. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी, कित्येक शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना (Crop insurance scheme) राबविली जाते. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी, कित्येक शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

राज्यात यावर्षी खरीप पिकांच्या (crops) नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ४१.६३ लाख पूर्वसूचना दिलेल्या आहेत. त्यापै​​की ३०.५६ लाख प्रकरणांमध्ये कंपन्यांनी सर्वेक्षण प्रक्रिया (Survey Process) पूर्ण केली आहे. मात्र भरपाई दिलेली नाही. भरपाई लवकरच देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सावधान! मुंबईतून तब्बल 400 किलो भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषधी विभागाने दिली माहिती

कृषी विभागाकडून विविध जिल्ह्यांमधील रखडलेल्या कामांचा आढावा घेतला जात आहे. मात्र कंपन्यांची दिरंगाई कायम आहे. कृषी आयुक्तालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक नैसर्गिक आपत्तींबाबत साडे दहा लाख शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी ८३६ कोटीची भरपाई देणे अपेक्षित आहे. त्यासाठी अत्यावश्यक असलेली प्रक्रिया सुरू असल्याचे बोलले जात आहे.

आतापर्यंत ४९७४ शेतकऱ्यांना २.६३ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे. आतापर्यंत १५ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढल्या आहेत. यातील जालना, गोंदिया, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील १.४९ लाख शेतकऱ्यांना ४७.४१ कोटीची नुकसान भरपाई देखील देण्यात आलेली आहे. १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना (farmers) नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; तब्बल 14 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई, शासन निर्णय जारी

दिवाळीपूर्वी भरपाई जमा करण्याचे प्रयत्न

स्थानिक नैसर्गिक आपत्तीबाबत राज्यातून आतापर्यंत ३०.५६ लाख पूर्वसूचना आलेल्या आहेत. त्यातील जवळपास १०.५९ लाख पूर्वसूचनांची नुकसान भरपाई निश्‍चित झाली आहे. ही रक्कम ८३६ कोटी रुपयांच्या आसपास येते. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कृषी विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या 
आता लाइटचे नो टेंशन! फुकटात वीज निर्माण करणारा जनरेटर लॉन्च, होणार असा फायदा
बापरे बाप! तब्बल 10 कोटींची म्हैस; पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 273 कोटी नुकसान भरपाई जमा

English Summary: Crop insurance amount over 10 lakh farmers stopped Farmers waiting Published on: 20 October 2022, 04:13 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters