या वर्षी जुलै महिन्यापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आणि आता परतीच्या पावसाने देखील त्याच पद्धतीने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला आहे. जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर आता खरीप हंगामाच्या बऱ्याच पिकांचे काढणीचे काम सुरू असतानाच परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम या पावसाने केले आहे.
नक्की वाचा:IMD Rain Alert: मुसळधार पावसाचे सत्र सुरूच! चक्रीवादळामुळे या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा
त्यामुळे शेतकरी बंधू सर्व बाजूंनी आता त्रस्त झालेले असतानाच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती बातमी म्हणजे आज विदर्भाच्या अनेक भागांमधून मान्सून निघून गेला असून येणाऱ्या 48 तासात मान्सून देशातून निघून जाणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस.होसाळीकर यांनी दिली आहे.
नक्की वाचा:परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सोयाबीन, भुईमूग, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
24 ऑक्टोबरला समुद्रकिनारी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून 25 तारखेला चक्रीवादळ आंध्र आणि ओरिसा किनारपट्टीपासून पश्चिम बंगाल, बांगलादेशकडे जाणार असून या चक्रीवादळाचा कुठलाही प्रकारचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नसल्याचे देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यादरम्यान आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि
मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून येणाऱ्या दोन दिवसात पुणे, कोल्हापूर आणि सातारा या भागात ढगाळ वातावरण राहणार असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Share your comments