Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची (Rain Alert) हजेरी बघायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील पावसाबाबत मोठी माहिती दिली आहे.
IMD नुसार, या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या किनारी आणि मध्य भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सारख्या काही किनारी जिल्ह्यांमध्ये शुक्रवार ते रविवार या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Monsoon) पडण्याची शक्यता आहे.
यासह, पुणे आणि सातारा सारख्या जिल्ह्यांमध्ये आठवड्याच्या शेवटी जोर वाढण्याची शक्यता असली तरी शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस (Monsoon News) पडेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
आयएमडीच्या अंदाजानुसार, रविवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मापदंडानुसार, 24 तासांच्या कालावधीत 64.5 मिमी ते 115.5 मिमी पाऊस जास्त म्हणून वर्गीकृत आहे, तर 24 तासांमध्ये 115.6 मिमी आणि 204.4 मिमी पाऊस खूप जास्त म्हणून वर्गीकृत आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि इतर बहुतांश महाराष्ट्रीय जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने, येलो यलो अलर्ट जारी केला आहे.
तर रत्नागिरी आणि रायगड शुक्रवार ते रविवार दरम्यान ऑरेंज अलर्टवर राहणार आहेत. त्याचवेळी महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर खराब हवामान असल्याने मच्छिमारांना पुढील किमान तीन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
IMD ने 11 सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे
विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेता, IMD कडून 11 सप्टेंबरपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गणेश चतुर्थी उत्सवाच्या शेवटी होणारे गणपती विसर्जन पाहता, मूर्ती विसर्जनाच्या वेळी भाविकांना काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. मात्र, दरम्यान, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला गेला.
Share your comments