1. हवामान

Havaman Andaaj: अरे देवा! राज्यातील 'या' जिल्ह्यांवर नोव्हेंबर महिन्यात परत पावसाचे सावट, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

सध्याचे एकंदरीत शेती कामाची स्थिती पाहिली तर खरीप हंगामातील पिकांची काढणी आता अंतिम टप्प्यात आली असून रब्बी हंगामाची तयारी जोरात सुरू झाली आहे. यावर्षी आपण जर पावसाने केलेल्या नुकसानीचा विचार केला तर जून महिना सोडला तर संपूर्ण पावसाळ्याचा कालावधी हा महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घालण्यातच गेला. त्यामुळे शेतकरी बंधूंचे अतोनात नुकसान झाले असून या संकटातून आता कुठे शेतकरी बंधू सावरत असताना पुन्हा हवामान खात्याचा या इशारामुळे शेतकरी बंधूंच्या समस्यामध्ये आणखी भर पडेल हे मात्र निश्चित.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
rain guess in some district in state

rain guess in some district in state

सध्याचे एकंदरीत शेती कामाची स्थिती पाहिली तर खरीप हंगामातील पिकांची काढणी आता अंतिम टप्प्यात आली असून रब्बी हंगामाची तयारी जोरात सुरू झाली आहे. यावर्षी आपण जर पावसाने केलेल्या नुकसानीचा विचार केला तर जून महिना सोडला तर संपूर्ण पावसाळ्याचा कालावधी हा महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घालण्यातच गेला. त्यामुळे शेतकरी बंधूंचे अतोनात नुकसान झाले असून या संकटातून आता कुठे शेतकरी बंधू सावरत असताना पुन्हा हवामान खात्याचा या इशारामुळे  शेतकरी बंधूंच्या समस्यामध्ये आणखी भर पडेल हे मात्र निश्चित.

नक्की वाचा:आता आधीच ओळखा आपल्या पिकांवर कोणते येणार किडी-रोग आता आधीच ओळखा आपल्या पिकांवर कोणते येणार किडी-रोग

 महाराष्ट्रावर परत पावसाचे संकट

 जर आपण सध्याचा हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यांच्यानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये परत एकदा महाराष्ट्रात पाऊस कोसळण्याची शक्यता असून दरवर्षीप्रमाणे चालू वर्षे देखील नोव्हेंबर महिन्यात पावसाची शक्‍यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

परंतु यामध्ये एक जमेची बाजू अशी आहे की, हवामान विभागाच्या मते यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर मध्ये जो काही पाऊस कोसळेल तो सरासरी पेक्षा कमी राहणार आहे.

आताच्या या कालावधीमध्ये जरा हवामान खात्याचा सुधारित अंदाज पाहिला तर त्यांच्यानुसार रत्नागिरी, सातारा, सांगली तसेच अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव तसेच औरंगाबाद,अहमदनगर या जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात पडणारा जो पाऊस आहे.

नक्की वाचा:Crop Management: खत आणि किडनियंत्रणासाठीचे 'हे' उपाय म्हणजे भेंडीचे भरघोस उत्पादन मिळण्यासाठीचे आहे उपयुक्त तंत्र,वाचा डिटेल्स

 तो सरासरीपेक्षा कमी राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पाऊस कमी राहील परंतु तो नोव्हेंबर महिन्यामध्ये कोसळेल हे मात्र निश्चित. या बाबतीत जर आपण विचार केला तर या महिन्यांमध्ये सोलापूर तसेच मराठवाड्यातील काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भामध्ये  नोव्हेंबर महिन्यामध्ये  जो काही पाऊस पडतो त्याच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाचे नोंद होणार आहे.

या कालावधीमध्ये पावसाचे वातावरण देखील राहील व थंडीचा जोर देखील वाढण्याची शक्यता आहे.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कालावधीमध्ये थंडीमध्ये जी काही वाढ होणार आहे ती रब्बी पिकांसाठी पोषक असणार असून शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण असा हा कालावधी राहू शकतो.

नक्की वाचा:राजकारण ठेवू बाजूला, ऊस दर, काटामारी , तोडीचे पैसे बंद करण्यासाठी नादाला लागू स्वाभिमानीच्या कारण....

English Summary: indian meterological department guess to rain in some district in state Published on: 08 November 2022, 03:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters