जून महिना कोरडा काढल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली व पाहता पाहता महाराष्ट्रातील बहुतांश धरणे पाण्याने तुडुंब भरली. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे देखील फार अतोनात नुकसान झाले. परंतु गेल्या सात दिवसांपासून अचानक पावसाने दडी मारली व काहीसा दिलासा मिळाला असंच म्हणावे लागेल.
परंतु आता परत पुढील पाच दिवस राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाच्या प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली की,
येणाऱ्या पाच दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून त्यासोबतच दुसऱ्या दिवसापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
काही तारखांचा हवामानाचा अंदाज
1- चार ऑगस्ट- कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पाऊस पडेल तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:पावसाचा जोर वाढणार! या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, IMD चा इशारा
2- पाच ऑगस्ट- कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा देखील बर्याच ठिकाणी चांगला पाऊस पडेल व तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. जर आपण विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:पावसाची बातमी! पुढील ४ दिवस देशातील या भागात पडणार धो धो पाऊस; IMD चा इशारा
Share your comments