1. हवामान

8 ऑगस्ट पर्यंतचा पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला रे..! कुठं-कुठं कोसळणार पाऊस; वाचा काय म्हणतायत डख

Panjabrao Dakh: शेतकरी बांधव (Farmers) मोठ्या आतुरतेने पंजाबराव डख साहेबांच्या (Panjabrao Dakh) मान्सून अंदाजाची वाट पाहत असतात. पंजाबराव डख यांचा सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार अशी भविष्यवाणी केली आहे.

पंजाबरावांचा मान्सून अंदाज

पंजाबरावांचा मान्सून अंदाज

Panjabrao Dakh: शेतकरी बांधव (Farmers) मोठ्या आतुरतेने पंजाबराव डख यांच्या (Panjabrao Dakh) मान्सून अंदाजाची वाट पाहत असतात. पंजाबराव डख यांचा सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार अशी भविष्यवाणी केली आहे.

शेतीचा खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण आहे.

पंजाबराव यांच्या मते 8 ऑगस्ट पडणारा हा पाऊस सर्वदूर नसणार, म्हणजेच या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पण मोठा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे. मात्र असे असले तरी 8 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर हवामान कोरडे राहणार आहे.

पावसाची बातमी! पुढील ४ दिवस देशातील या भागात पडणार धो धो पाऊस; IMD चा इशारा

पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, ३ ऑगस्ट पर्यंत राज्यात सूर्यदर्शन कायम राहणार आहे. पंजाबरावांनी शेतकरी बांधवांना 3 ऑगस्टपर्यंत शेतीची सर्व कामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे.

३ ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र, त्यानंतर चार ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर अतिशय मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता या वेळी पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

पावसाचा जोर वाढणार! या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, IMD चा इशारा

पंजाबराव डख यांनी मान्सूनच्या अंदाजा समवेतच शेतकरी बांधवांसाठी एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. डक यांच्यामध्ये शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यापूर्वी जमिनीची ओल तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे.

English Summary: Panjabrao's monsoon forecast till August 8 Published on: 02 August 2022, 05:31 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters