Panjabrao Dakh Update :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठा खंड दिला असल्यामुळे खरिपाची सर्व पिके धोक्यात आलेली आहेत. जवळजवळ संपूर्ण ऑगस्ट महिनाच कोरडा गेल्यामुळे दुष्काळाचे सावट राज्यावर घोंगावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पिण्याच्या पाण्याची देखील समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असून महाराष्ट्रातील बहुसंख्य धरणातील पाणी पातळीमध्ये कमालीचे घट झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊस महाराष्ट्रमध्ये कसा बरसणार? हा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा ठाकला आहे.
जर सध्या आपण पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीचा विचार केला तर येणाऱ्या पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन होण्याची शक्यता या माध्यमातून आपल्याला दिसून येते.
परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची आवश्यकता असून तरच खरिपाच्या पिकांना आणि धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. या सगळ्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मात्र हवामान अंदाजाच्या बाबतीत प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख यांनी येणारा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील पावसा संबंधी अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाब रावांनी व्यक्त केलेला अंदाज
जर आपण भारतीय हवामान विभागाचा विचार केला तर त्यांच्या मते इंडियन ओशियन डायपोल अर्थात आयओडी आता सक्रिय होणार असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आणि ऑक्टोबर महिन्यात देखील परतणारा पाऊस देखील चांगला होणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. 8 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असे देखील हवामान विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
याच पद्धतीचा अंदाज पंजाबरावांनी देखील व्यक्त केला असून राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला असून पाच सप्टेंबर नंतर राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल असे देखील त्यांनी नमूद केले आहे. म्हणजेच हवामान विभाग आणि पंजाब रावांचा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील चांगला पावसाचा अंदाज असल्यामुळे नक्कीच शेतकरी बंधूंना दिलासा मिळेल.
Share your comments