अहमदनगर : शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्वाची बातमी समोर येतं आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Meteorological Department) नुकताच हवामान अंदाज (Weather forecast) जारी केला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ग्रामीण कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांसाठी एक सल्ला जारी केला आहे. हवामान केंद्राने अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्यात 29 एप्रिल ते 1 मे पर्यंत तापमानात वाढ होणार यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 26 तारखेला अर्थात आज कृषी सेवा सल्ला समितीची एक बैठक पार पडली, या बैठकीत शेतकऱ्यांना आगामी काही दिवस पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून विजेचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विशेषता पारनेर, कर्जत श्रीगोंदा या तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.
या तालुक्यात 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज आहे या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी स्वतःची तसेच त्यांच्या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय शेतकरी बांधवांना जनावरांची काळजी घेण्याचा देखील या वेळी सल्ला देण्यात आला आहे.
तापमानात वाढ होणार असल्याने पाऊस आणि भुईमूग पिकाला पाण्याची गरज भासणार आहे या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे या काळात शेतकरी बांधवांनी पिकांच्या गरजेनुसार हलक्या स्वरूपात पाणी व्यवस्थापन करणे अपरिहार्य राहणार आहे.
शेतकरी मित्रांनो या काळात आपली जनावरे सावलीत बांधावी तसेच त्यांना पिण्यासाठी भरपूर पाणी द्यावे. जनावरांना दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सावलीत बांधून ठेवावे. त्यांना हिरवागार चारा तसेच प्रथिने युक्त खाद्य पदार्थ द्यावे. जनावरांना सकाळी आणि सायंकाळी चारण्यासाठी न्यावे. यावेळी गोठ्याचे तापमान नियंत्रित करावे लागणार आहे. निश्चितच वाढत्या तापमानामुळे शेतकरी बांधवांना स्वतःची तसेच जनावरांची काळजी घ्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
Successful Farmer : दहावी पास महिला शेतकऱ्याने एका एकरात शिमला मिरची लागवड करून कमविले 14 लाख
मोठी बातमी! पीएम किसान योजनेचे 2 हजार 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही
Share your comments