1. यशोगाथा

Successful Farmer : दहावी पास महिला शेतकऱ्याने एका एकरात शिमला मिरची लागवड करून कमविले 14 लाख

भारत एक शेतीप्रधान देश आहे देशाची जीडीपी ही सर्वस्व शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेती क्षेत्र मजबूत होणे आणि शेतकरी बांधव आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे अति महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाला तर प्रयत्न करावयाचे आहेतचं मात्र शेतकऱ्यांना देखील या अनुषंगाने आता कार्य करणे गरजेचे झाले आहे. अनेक शेतकरी बांधव या दृष्टीने काम देखील करताना बघायला मिळत आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
a farmer earn millions from capsicum crop

a farmer earn millions from capsicum crop

भारत एक शेतीप्रधान देश आहे देशाची जीडीपी ही सर्वस्व शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेती क्षेत्र मजबूत होणे आणि शेतकरी बांधव आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे अति महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाला तर प्रयत्न करावयाचे आहेतचं मात्र शेतकऱ्यांना देखील या अनुषंगाने आता कार्य करणे गरजेचे झाले आहे. अनेक शेतकरी बांधव या दृष्टीने काम देखील करताना बघायला मिळत आहेत.

शेतीमध्ये आता शेतकरी बांधव काळाच्या ओघात बदल करू लागले आहेत. आता पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत बळीराजा नवनवीन नगदी पिकांची लागवड करू लागला आहे. नगदी पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची देखील सिद्ध होत आहे.

पीकपद्धतीत बदल करून नगदी पिकांची लागवड केली तर काय होऊ शकते याचीच प्रचिती समोर आली आहे ती जळगाव जिल्ह्यातून. जळगाव जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या शेतीतुन लाखो रुपयांची कमाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या मौजे लोंढे येथील कोकीलाबाई देवीदास पाटील यांनी एक एकरात शिमला मिरची लागवड करून 14 लाखांचे उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

संबंधित बातमी : कृषी विभागाचा महत्वपूर्ण सल्ला आला रे…..!! खरीप हंगामात सोयाबीन बियाणे खरेदी करताना बाळगा ही सावधानता

कोकीलाबाई यांना महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण पोखरा योजनेच्या माध्यमातून 0.40 हेक्टर क्षेत्रासाठी शेडनेट उभारणे हेतू सोळा लाखांचे अनुदान मिळाले. त्यांना शेडनेट उभारण्यासाठी एकूण 23 लाखांचा खर्च आला उर्वरित खर्च कोकीलाबाई यांनी आपल्या स्वतःच्या पैशांनी केला.

शेडनेट उभारणी केल्यानंतर त्यांनी पोखरा योजनेअंतर्गत शेडनेट हाऊस प्रशिक्षण घेतले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर कोकीलाबाई यांनी शिमला मिरची लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला. शिमला मिरची लागवडीसाठी कोकीलाबाई यांना जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च आला.

मिरची लागवड केल्यानंतर वेळोवेळी कृषी तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन कोकीलाबाईना मिळाले. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या अपार कष्टामुळे कोकीलाबाई यांनी केवळ एका एकरात तब्बल 40 टन मिरचीचे उत्पादन घेतले. मिरचीचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर कोकीलाबाई यांनी आपली मिरची सुरत येथे विक्रीसाठी पाठवली असता त्यांना 40 रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळाला.

अशा तऱ्हेने कोकीलाबाई यांनी एका एकरात लावलेल्या शिमला मिरचीच्या माध्यमातून तब्बल 14 लाखांचे यशस्वी उत्पन्न मिळवले. शिमला मिरची लागवडीसाठी त्यांना दीड लाखांचा खर्च आला आणि ती जोपासण्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च आला अशा तऱ्हेने त्यांना एकूण चार लाखांचा उत्पादन खर्च करावा लागला.

हेही वाचा : Minister Dada Bhuse : कृषिमंत्री दादाजी भुसे यांची कौतुकास्पद 'दादागिरी'!! दादांनी जुगार अड्डा केला उध्वस्त…..

म्हणजेच त्यांना दहा लाखांचा शिमला मिरचीच्या शेतीतून निव्वळ नफा राहिला. त्यांच्या या कार्याची दखल आता वेगवेगळ्या माध्यमांतून घेतली जात आहे. त्यांना नुकताच मार्च महिन्यात आदर्श शेतकरी महिला पुरस्कार देण्यात आला आहे. निश्चितच कोकीळाबाईनी केलेला हा अभिनव उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो आणि निश्चितचं भविष्यात कोकीळाबाई सारखे अनेक महिला शेतकरी शेतीमध्ये यशस्वी वाटचाल करतील.

हेही वाचा : Sugarcane Farming : ऊसाचे क्षेत्र असेच वाढत राहिले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल : नितीन गडकरी

English Summary: Successful Farmer: Tenth pass woman farmer earns Rs 14 lakh per acre by cultivating capsicum Published on: 26 April 2022, 04:35 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters