1. बातम्या

Untimely Rain: आगामी दोन दिवस अवकाळी पावसाचे…! राज्यात कुठे-कुठे बरसणार पाऊस; याचा शेतकऱ्यांवर काय होणार परिणाम

अवकाळी पावसाने (Untimely Rain) गत वर्षी खरीप हंगामात तसेच रब्बी हंगामात (Rabi Season) मोठा धुमाकूळ घातला होता. पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे सावट बघायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात असेच अरबी समुद्रात चक्रीय वादळी वारे वाहणार् असल्याने आगामी दोन दिवस राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले गेले आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
भारतीय हवामान खात्याचा अंदाज आला रे.....!

भारतीय हवामान खात्याचा अंदाज आला रे.....!

अवकाळी पावसाने (Untimely Rain) गत वर्षी खरीप हंगामात तसेच रब्बी हंगामात (Rabi Season) मोठा धुमाकूळ घातला होता. पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे सावट बघायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात असेच अरबी समुद्रात चक्रीय वादळी वारे वाहणार् असल्याने आगामी दोन दिवस राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले गेले आहे.

याबाबत भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) नुकताच एक अंदाज सार्वजनिक केला आहे. उद्या म्हणजेच 19 तारखेला आणि 20 तारखेला राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र पावसाच्या सऱ्या बसणार असल्याचे सांगितले जात आहे. हे दोन दिवस पावसाचे राहणार आहेत आणि या काळात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या चोवीस तासात वाऱ्याची दिशा बदलल्याने पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. राज्यातील अनेक भागात आगामी दोन दिवस अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे. यामुळे राज्यातील उकाड्याने त्रस्त असलेली जनतेला दिलासा मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यात, कोकणात (Konkan) तसेच मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) पावसाची शक्यता आहे.

एकंदरीत विदर्भ वगळता राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंदाजामुळे विदर्भातील जनतेला वाढलेल्या तापमानाचा अजून काही दिवस असाच सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी कोकणातील फळ बागायतदारांना तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील फळ बागायतदारांना व रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला गेला असल्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील फळ बागायतदारांना याचा मोठा फटका बसू शकतो अशी आशंका व्यक्त केली जात आहे.

असे असले तरी भारतीय हवामान खात्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी या पावसाळ्याचा पहिला अंदाज घोषित केला आहे. यानुसार यावर्षी सरासरीच्या 99 टक्के पाऊस बरसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. गत खरीप व रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला हा अंदाज शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा ठरत आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या गालावर स्मितहास्य खुलले आहे. 

English Summary: Untimely Rain: The next two days of unseasonal rain…! It will rain here and there in the state; What will be the effect on farmers? Published on: 18 April 2022, 01:54 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters