1. हवामान

IMD Rain Alert: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ! महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

IMD Rain Alert: राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. काही जोरदार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आज पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
Heavy Rain Maharashtra

Heavy Rain Maharashtra

IMD Rain Alert: राज्यात परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातले आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. काही जोरदार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आज पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आता देशभरातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) लोकांना दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी उत्तर भारतात हवामान हळूहळू बदलत आहे. त्यामुळे आता सखल भागात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.

मात्र, दक्षिणेबाबत बोलायचे झाले तर महाराष्ट्रापासून कर्नाटक आणि केरळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळ (Cyclone) निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यता आहे.

Nano Urea: नॅनो युरियाचा शेतकऱ्यांना किती फायदा? थेट पंतप्रधान मोदींनीच सांगितलं

मुंबई, रायगड, पुणे, पालघर, ठाणे यासह राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसाचा इशारा असताना राज्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे

महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक ठिकाणी धो धो कोसळला, आजही अतिवृष्टीचा इशारा

IMD नुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यासह हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र वादळाचे रूप धारण करण्याची शक्यता आहे.

परंतु त्याची तीव्रता आणि मार्गाबाबत कोणताही अंदाज जारी केला जात नाही. ते म्हणाले की, कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतरच आपण चक्रीवादळाबाबत अधिक माहिती देऊ शकतो. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर ओडिशा सरकारने 23 ते 25 ऑक्टोबरदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:
वाहनधारकांसाठी मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पहा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव...
सोने खरेदीदारांसाठी दिवाळीत सुवर्णसंधी! सोने 5800 तर चांदी 24000 रुपयांनी स्वस्त...

English Summary: IMD Rain Alert: Cyclone in Bay of Bengal! Heavy rain warning for many states including Maharashtra Published on: 19 October 2022, 11:32 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters