1. इतर बातम्या

Petrol-Diesel Price: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पहा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव...

Petrol-Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाच्या दरात आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
petrol-diesel price

petrol-diesel price

Petrol-Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) दर गगनाला भिडले आहेत. मात्र सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाच्या दरात आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या स्थिर दरामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरल्याचा विशेष फायदा सर्वसामान्यांना होत नाही. मात्र, बऱ्याच दिवसांपासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे जनतेलाही दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर बऱ्याच काळापासून प्रति बॅरल $95 च्या खाली आहे. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय बाजारात तेल कंपन्यांनी 19 ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. ताज्या अपडेटनुसार, किमती मागील स्तरावर स्थिर राहिल्या आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96 रुपयांच्या वर आहे. त्याचबरोबर मुंबई, चेन्नई, कोलकाता येथील दरातही कोणताही बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असले तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही.

22 मे रोजी केंद्र सरकारने देशभरातील पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हापासून देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर इतका आहे.

Edible Oil: सर्वसामान्यांची दिवाळी होणार कडू! खाद्यतेलाच्या किमती पुन्हा देणार दणका

आज महानगरांमध्ये तेलाच्या किमती किती आहेत?

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटरवर कायम आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दुहेरी दिवाळी भेट! काल खात्यात पैसे तर आज पिकांच्या हमीभावात वाढ

इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटरवर कायम आहे.

त्याच वेळी, यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोलचा दर 96.57 रुपये आणि डिझेलचा दर 89.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या:
सोने खरेदीदारांसाठी दिवाळीत सुवर्णसंधी! सोने 5800 तर चांदी 24000 रुपयांनी स्वस्त...
Nano Urea: नॅनो युरियाचा शेतकऱ्यांना किती फायदा? थेट पंतप्रधान मोदींनीच सांगितलं

English Summary: Petrol-Diesel Price: Fall in crude oil prices, check today's petrol diesel prices Published on: 19 October 2022, 11:00 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters