1. बातम्या

7th pay commission ! सरकारच्या 'या' निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा

7th Pay Commission ! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Staff) मोठा दिलासा दिला आहे.

7th pay commission

7th pay commission

7th Pay Commission ! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Staff) मोठा फायदा होणार आहे.

सरकारी कर्मचार्‍यांना घर बांधण्यासाठी बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (Advance) म्हणजे होम लोन अ‍ॅडव्हान्ससाठी व्याजदर 7.9 टक्केवरून कमी करून 7.1 टक्के केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकारने यासाठी ऑफिस मेमोरेंडम सुद्धा जारी केला आहे.

केंद्र सरकारने १ एप्रिल २०२२ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंतसाठी कर्मचार्‍यांना घर बांधण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदीसाठी घेतलेल्या अ‍ॅडव्हान्सच्या व्याजात (Home Loan Advance) कपात केली आहे. आता त्यांना 0.8 टक्के कमी व्याज द्यावे लागेल. सरकारने 80 बेसिस पॉईंटची कपात केली आहे.

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये होणार 'इतकी' वाढ

अ‍ॅडव्हान्सचा व्याजदर

घर आणि शहरी प्रकरणांत मंत्रालयाने ऑफिस मेमोरेंडम जारी करून होम लोन अ‍ॅडव्हान्सच्या (Home Loan Advance) व्याजदरात कपातीची माहिती दिली आहे. कर्मचार्‍यांना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत 7.1 टक्के वार्षिक व्याजदराने अ‍ॅडव्हान्स मिळू शकतो. अगोदर हा दर 7.9 टक्के वार्षिक होता.

इतका मिळणार अ‍ॅडव्हान्स

कर्मचारी घर बांधण्यासाठी सरकारकडून होम लोन (Home Loan) अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात. हे लोन दोन पद्धतीने मिळू शकते. २४ महिन्यांचे बेसिक वेतन किंवा २५ लाख रूपये अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात. याशिवाय घराची किंमत किंवा कर्ज परतफेडीच्या क्षमतेच्या आधारावर सुद्धा अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात.

बिग ब्रेकिंग : गव्हाच्या निर्यातीवर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

DA आणि DR मध्ये होणार 'इतकी' वाढ

जुलै-ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये 4% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा DA आणि DR 34 वरून 38% पर्यंत वाढेल.

English Summary: 7th pay commission! The government's decision will greatly benefit the employees Published on: 14 May 2022, 05:35 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters