IMD Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. तसेच काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा परतीचा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील इतर राज्यांमध्येही धो धो पावसाची कोसळधार सुरूच आहे. तसेच येत्या काही दिवसांत मान्सून (monsoon) जाता जाता पुन्हा मुसळधार पडण्याची वर्तवण्यात येत आहे.
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य भारतातील काही भागांतून मान्सून निघून जाण्याचा अंदाज आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक भागात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. आजही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील नोरू वादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. चीन समुद्रातून निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा बंगालच्या उपसागरात परिणाम होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुर्गापूजेदरम्यान पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडसह अनेक भागात पाऊस पडू शकतो.
कांद्याने शेतकऱ्यांना रडवले! शेतकऱ्यांचा बांध फुटला; शेतकरी बसले उपोषणाला
हवामान खात्यानुसार, आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पाऊस पडू शकतो. यासोबतच आजही उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, उत्तराखंड, मेघालय, अंदमान आणि निकोबारच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. तसेच कोस्टल आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट (Skymate) हवामानानुसार, तामिळनाडू, अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलक्या ते मध्यम पावसासह एक किंवा दोन जोरदार पाऊस पडू शकतो.
EPFO खातेधारकांच्या खात्यात या दिवशी येणार 81,000 रुपये; अशा पद्धतीने तपासा
ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, बिहार, महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम, केरळ आणि लक्षद्वीपमध्येही पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
ऊसाच्या या ३ जाती रोग आणि कीड प्रतिरोधक आहेत; भरघोस उत्पादनही देतील
शेतकरी पुत्राला सलाम! वडिलांची मेहनत ठरली मुलांसाठी प्रेरणादायी; कमी खर्चात तयार केले कृषी ड्रोन
Share your comments