IMD Alert: राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात पाऊसाने थैमान घातलंय. शुक्रवारी संध्याकाळी मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर दिसून आला. सुरू असलेला परतीचा पाऊस पुढचे काही दिवस असणार आहे.
हवामान खात्याकडून पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात आलंय. महाराष्ट्र राज्यात आयएमडीने मुंबईसह आसपासच्या परिसराला यलो अलर्ट जारी केलाय.
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: गॅस सिलिंडर संदर्भात नवे नियम जारी, आता फक्त 'या' लोकांनाच मिळणार सब्सिडी
आज राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा: केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्यांची लूट करतंय; राजू शेट्टीचा घणाघाती आरोप
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोकणासह मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर
तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा: पाव्हणं लगीन ठरलं रं! शिंदे-ठाकरे लग्नांची राज्यात चर्चा
Share your comments