1. इतर बातम्या

LPG Cylinder: गॅस सिलिंडर संदर्भात नवे नियम जारी, आता फक्त 'या' लोकांनाच मिळणार सब्सिडी

LPG Cylinder: गॅस सिलिंडरसंदर्भात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आता आपण एका वर्षात किती सिलिंडर घेऊ शकता. यासंदर्भात नवे नियम जारी करण्यात आले आहेत. तर जाणून घ्या, आपण एका वर्षांत किती सिलिंडर घेऊ शकता.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
LPG Cylinder

LPG Cylinder

LPG Cylinder: गॅस सिलिंडरसंदर्भात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आता आपण एका वर्षात किती सिलिंडर घेऊ शकता. यासंदर्भात नवे नियम जारी करण्यात आले आहेत. तर जाणून घ्या, आपण एका वर्षांत किती सिलिंडर घेऊ शकता.

गॅस सिलिंडर विकत घेण्यासंदर्भात नवे नियम तयार करण्यात आले आहेत. आता ग्राहकांसाठी घरगुती अथवा स्वयंपाकाच्या गॅसची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

यानुसार आता कुठल्याही ग्राहकाला एका वर्षांत केवळ 15 सिलिंडर्ससाठीच बुकिंग करता येणार आहे. अर्थात आता आपल्याला एका वर्षात केवळ 15 सिलिंडरच मिळू शकणारन आहेत. एका महिन्यात आपल्याला 2 हून अधिक सिलिंडर विकत घेता येणार नाहीत.

हेही वाचा: राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आखली रणनीती; आता...

माध्यमांतील वृत्तांनुसार, एका वर्षात अनुदानित सिलिंडर्सची संख्या 12 झाली आहे. अर्थात आपण 15 सिलेंडर घेतले असले तरी, आपल्या केवळ 12 सिलिंडरवरच हे अनुदान अथवा सब्सिडी मिळणार आहे.

हेही वाचा: पाव्हणं लगीन ठरलं रं! शिंदे-ठाकरे लग्नांची राज्यात चर्चा

IOC नुसार, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती जारी करण्यात आल्या आहेत. यानंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.5 रुपये, चेन्नईत 1068.5 रुपये आणि कोलकात्यात 1079 रुपये एवढी झाली आहे.

हेही वाचा: केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्यांची लूट करतंय; राजू शेट्टीचा घणाघाती आरोप

English Summary: LPG Cylinder: New rules issued regarding gas cylinders Published on: 08 October 2022, 09:26 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters