राज्यात 15 डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंदौस या चक्रीवादळामुळं दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोगांवत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच पूर्व विदर्भात देखील उद्या आणि परवा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर देखील पावसांच सावट आहे. विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
घरी बसून मोबाईल वर पैसे कसे कमवायचे आहेत का? तर ही बातमी वाचाच...
सध्या वातावरणात मोठा बदल झालाय. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्याता आला आहे. मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, कोकणासह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्याता आला आहे.
आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.
Share your comments