राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे. काहीच भागात एकदम हलका पाऊस पडत आहे. त्यातच आजही हवामान विभागाने राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच (दि.२५) विदर्भात सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाने खंड दिल्याने खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर आणि संभाव्य उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
English Summary: Heavy rain forecast in the state See which alerts are in your areaPublished on: 24 August 2023, 06:25 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments