Weather News :
राज्यात आज जोरदार पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र राज्यात जोरदार नाही पण हलक्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता कायमच आहे. त्यातच हवामान खात्याने उद्या (दि.१५) पासून जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्या जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.
पुणे विभागात चांगला पाऊस
राज्यात काही भागात अद्यापही अपेक्षित चांगला पाऊस झाला नाही. आतापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या ८३६.३ मिलिमीटरपैकी ४९२.६ मिलिमीटर म्हणजेच अवघा ५८ टक्के पाऊस पडला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार आहे. त्यामुळे ते दाब क्षेत्र ओडिशा आणि उत्तर आंध्रप्रदेश किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
Share your comments