राज्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच आज नाशिक जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी पावसासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो देण्यात आला आहे.
काल रात्री छत्रपती संभाजीनगर येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित भागांसध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर आज नाशिक आणि मराठवाड्यात गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुढील ४८ तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटसह तुरळ पाऊस होण्याची शक्यता आहे. एक चक्रीय स्थिती ईशान्य अरबी समुद्रावर आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ तयार होत आहे. त्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस तुरळ ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला असून, काही ठिकाणी पावसामुळे तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे.
Share your comments