Weather Update :
राज्यात आज गणेश विसर्जन सोहळा पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे. मराठवाडा, कोकण या भागात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसंच परतीच्या मान्सूनसाठी देखील पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मात्र अनेक भागात अद्यापही जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणाच्या भागात पाऊस झाला आहे. मात्र काही जिल्ह्यात अजूनही चांगला पावसाची शक्यता आहे. दरम्यान आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान खात्याने आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणाच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कर्नाटक, गोवा आणि केरळ किनारपट्टीवरील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, देशातून मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थानमधून नैऋत्य मान्सून माघारी फिरला आहे. भारताच्या आणखी काही भागांतून पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Share your comments