परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची सर्वच पिके पाण्यात असल्याने पिकांचे नुकसान (Damage to crops) होत आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सोयाबीन, कपाशी, तूर इ. पिके पाण्यात सापडली आहेत.
परभणी, हिंगोली जिल्ह्यात यावर्षी ८ लाख ५६ हजार ७७ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन ५ लाख २७ हजार २२९ हेक्टरवर, कपाशीची लागवड २ लाख ११ हजार ६०६ हेक्टरवर, तुरीची ७७ हजार ९६ हेक्टर पेरणी झाली. अतिवृष्टी, सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनला (soyabean) बसला आला.
आता अपात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार; 9 जिल्ह्यांसाठी तब्बल 755 कोटींचा निधी मंजूर
त्यामुळे ५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीनचे पिकाचे (crops) नुकसान झाले आहे. २ लाखांहून अधिक हेक्टरवरील कपाशी, ७७ हजार हेक्टरवरील तूर, हजारो हेक्टरवरील हळद, ऊस, फळे, भाजीपाला पिके पावसामुळे बाधित झाली आहेत.
परभणी व हिंगोलीची विमा संरक्षण स्थिती
परभण : परभणी जिल्ह्यात ५ लाख १० हजार ७२४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यात सोयाबीन २ लाख ६९ हजार ८०० हेक्टर, कपाशी १ लाख ७९ हजार ४४७ हेक्टर, तूर ३९ हजार ४८८ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. एकूण ६ लाख ७१ हजार ५७३ विमा प्रस्तावद्वारे शेतकऱ्यांनी ४ लाख ३८ हजार ८१२ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.
रब्बी हंगामासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यावर्षी ३ लाख ४६ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन २ लाख ५७ हजार ४२९ हेक्टर, कपाशी ३२ हजार १५९ हेक्टर, तूर ३८ हजार ४१८ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. एकूण ३ लाख ८० हजार ५०५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ८५१ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 62 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान
कमी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर; पोस्ट ऑफिसच्या तीन नव्या योजना लॉन्च, मिळतोय मोठा परतावा
शेतकऱ्यांनो जवस लागवडीसाठी 'या' सुधारित जातीचा वापर करा; होणार फायदाच फायदा
Share your comments