1. कृषीपीडिया

Rabbi Season Crops: रब्बी हंगामासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी बी-बियानांचा साठा उपलब्ध करून देत असते. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. विशेष म्हणजे शेतीसाठी बियाणे उपयुक्त ठरतात. मागच्या ३ वर्षात बियाणे विक्रीच्या तुलनेत सरासरीनुसार यावर्षी बियाण्यांची मागणी कृषी विभागाने केली आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी बी-बियानांचा साठा उपलब्ध करून देत असते. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. विशेष म्हणजे शेतीसाठी (farming) बियाणे उपयुक्त ठरतात. मागच्या ३ वर्षात बियाणे विक्रीच्या तुलनेत सरासरीनुसार यावर्षी बियाण्यांची मागणी (Demand for seeds) कृषी विभागाने केली आहे.

सर्वसाधारणपणे यावर्षी ४५ हजार ३७५ बियाण्यांची मागणी केली आहे. यामधील साधारण ५० टक्के बियाणे (Agricultural Seeds) उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी ४ लाख ५७ हजार १२६ हेक्टर क्षेत्र आहे.

LIC ची जबरदस्त योजना लाँच; गुंतवणुकीवर मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा

कृषी विभागाने (Department of Agriculture) यावर्षी ४ लाख ७४ हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी (Rabi season) होण्याच्या अंदाजानुसार नियोजन केले आहे. गेल्यावर्षी ४ लाख २३ हजार ९६३ हेक्टरवर पेरणी झाली होती. सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे आहे. गेल्या वर्षी १ लाख ९० हजार ६२० हेक्टरवर ज्वारी पेरली गेली होती.

यावर्षी २ लाख १० हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज वर्तवला जात आहे. एक लाख सहा हजार हेक्टरवर गहू, तर १ लाख २ हजार हेक्टरवर हरभरा पेरला गेला आहे. २०१९ मध्ये ३० हजार ३३९ क्विंटल, २०२० मध्ये ३५ हजार ०९३ क्विंटल, तर गेल्या वर्षी ३८ हजार ८८६ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती.

कौतुकास्पद! शेतकऱ्याने नवीन पद्धतीच्या वापराने १६ फूट ऊस वाढवला; घेतोय दुप्पट उत्पादन

त्या अनुषंगाने यंदा ४५ हजार ७३५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. मात्र सध्या सतत पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक भागांत वाफसा नसल्याने शेतकऱ्यांच्या (farmers) रब्बीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता आहे.

बियाणे मागणी (क्विंटल)

ज्वारी - ४२००, गहू - २७,३७५, हरभरा - १३,६५०, सूर्यफूल - ४, करडई - १, मका - ४००.

महत्वाच्या बातम्या 
आता अपात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार; 9 जिल्ह्यांसाठी तब्बल 755 कोटींचा निधी मंजूर
वाटाणा, शेवग्याचे भाव तेजीत; जाणून घ्या बाजार समितीतील बाजारभाव
सिंह, कन्यासह या राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

English Summary: Rabbi Season Crops Demand 45 thousand quintal seeds Published on: 14 October 2022, 11:19 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters