1. हवामान

अशी ही पावसाची कमाल! देशातील 'या' तीन राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती, 122 वर्षात दुसऱ्यांदा मान्सूनचे देशात असमान वितरण

आज देशामध्ये मान्सूनचे आगमन होवून जवळजवळ 45 दिवस पूर्ण झाले. देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जर पावसाच्या एकूण पडण्याचा विचार केला तर संपूर्ण देशभरात आतापर्यंत सरासरी 294.2 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते परंतु हा आकडा 335.2 मिमी पर्यंत पोहोचला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
drought situation arise in some state

drought situation arise in some state

 आज देशामध्ये मान्सूनचे आगमन होवून जवळजवळ 45 दिवस पूर्ण झाले. देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जर पावसाच्या एकूण पडण्याचा विचार केला तर संपूर्ण देशभरात आतापर्यंत सरासरी 294.2 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते परंतु हा आकडा 335.2 मिमी पर्यंत पोहोचला आहे.

म्हणजेच युपी, बिहार आणि पश्चिम बंगाल तसेच झारखंड यासारख्या चार राज्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती आहे. जर आपण लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश असून या राज्यात सरासरीपेक्षा 65 टक्के कमी पाऊस झाला आहे.

नक्की वाचा:IMD Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ! 'या' भागात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

 तशीच परिस्थिती बिहार मध्ये 42 टक्के, झारखंडमध्ये 49 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 24% इतका कमी पाऊस झाला आहे.

या दृष्टीने भारतीय हवामान विभागाचा आकडेवारीचा विचार केला तर 1901 पासून आतापर्यंत 122 वर्षांमध्ये आत्तापर्यंत जे काही पावसाचे असमान वितरण देशात झाले 1974 या वर्षानंतर दुसऱ्यांदा झाले आहे.

नक्की वाचा:Rain Update: पुणे वेधशाळेने पावसाबाबत दिलीहीमहत्वाची माहिती; वाचा...

 पावसाच्या या चार श्रेण्या आणि त्यासंबंधी पडलेल्या पावसाचे प्रमाण

 पावसाची पहिली श्रेणी मुसळधार (244.5 मी मी पेक्षा जास्त पाऊस ), जोरदार(35.5 ते 244.5 मीमी), मध्यम  (7.5 ते 35.5 मीमी) आणि हलका (7.5 मी मी) अशा चार श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते.

त्यानुसार गेल्या 45 दिवसांचा विचार केला तर हलका पावसात 1.6 टक्के वाढला आहे तर मध्यम प्रकाराच्या पावसात 8.9 टक्के वाढ झाली असून जोरदार पावसात 23.2 टक्के आणि मुसळधार पावसाच्या घटनात 186.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नक्की वाचा:IMD Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ! 'या' भागात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

English Summary: drought situation arise in uttar pradesh, zarkhand , bihar state Published on: 16 July 2022, 01:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters