1. हवामान

Rain Update: पुणे वेधशाळेने पावसाबाबत दिली ‘ही’ महत्वाची माहिती; वाचा...

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस (rain) कोसळत आहे. नदी-नाले, धबधबे ओसुंडून वाहत आहेत. या मुसळधार पावसाने अनेक लोकांचे जीव घेतले आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस (rain) कोसळत आहे. नदी-नाले, धबधबे ओसुंडून वाहत आहेत. या मुसळधार पावसाने अनेक लोकांचे जीव घेतले आहेत. तसेच अनेक अपघातं रोज घडत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी पर्यटनास 17 जुलैपर्यंत बंदी आणली आहे. या परिसरात 17 जुलैपर्यंत कलम 144 लागू असेल. तसेच पुणे जिल्ह्यातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र आता या पावसाबद्दल हवामान खात्याकडून (Meteorological Department) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजून दोन दिवस महाराष्ट्रात मान्सून बरसणार आहे. मात्र त्यानंतर संपूर्ण राज्यभरात पावसाचा जोर हळूहळू कमी कमी होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अनुपम कश्यपी यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

Maharashtra Government Decision: बाजार समितीतील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार

सध्या पुणे आणि घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. मात्र आता दोन दिवसांनंतर पाऊस उसंत घेणार असल्याची माहिती नक्कीच दिलासादायक आहे. असं असलं तरी पुढेच दोन दिवस रायगड, पालघरमध्ये उद्याही रेड अलर्ट राहणार आहे अशी माहिती वेधशाळेच्या संचालकांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर! 'पीओपी' लॉन्च, आता शेतमाल राज्याच्या बाहेर सहजपणे विकता येईल, वाचा माहिती
...आणि म्हशी रस्त्यावर बांधल्या; म्हशी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

English Summary: Rain Update: Pune Observatory gave 'this' important information about rain; read... Published on: 15 July 2022, 10:49 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters