सध्या मागील काही वर्षांपासून हवामानामध्ये खूप बदल होत असून या वेगाने होणारे हवामान बदलांमुळेच गंभीर घटनांचा अचूक अंदाज वर्तवण्यात जगभरातील वेधशाळांना खूप अडचणी येत आहेत, असे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. त्यामुळे आता हवामानविषयी अंदाज बांधताना जे काही प्रारूप आहे, त्यामध्ये सुधारणा करण्यावर साऱ्या जगाने लक्ष केंद्रित केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
नक्की वाचा:देशातील या भागांना आज मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड अलर्ट जारी
काय म्हणाले….
पुढे बोलताना मोहपात्रा यांनी सांगितले की, जे काही हवामान बदल होत आहे त्यामुळे देशभरात मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे तर हलक्या प्रमाणात पडणाऱ्या पावसात घट झाल्याचे दिसून येत आहे.
1901 ते आतापर्यंत भारतात किती पाऊस झाला याची सगळी नोंद हवामान खात्याकडे उपलब्ध आहे. परंतु त्यानुसार उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असून राजस्थानातील पश्चिम भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे.
एवढेच नाही तर पश्चिम बंगाल, मेघालय, नागालँड, बिहार आणि उत्तर प्रदेश सरकार राज्यांमध्ये तीस वर्षाच्या कालावधीचा विचार केला तर नैऋत्य मोसमी पावसात खूप घट झाल्याचे दिसून आले आहे.
नक्की वाचा:IMD Alert : पुढील ३ दिवस या राज्यांमध्ये धो धो कोसळणार; हवामान खात्याचा इशारा
यासंबंधीचे सगळी तपशिलवार माहिती केंद्र सरकारने 27 जुलै रोजी संसदेमध्ये दिली होती. एवढेच नाही तर अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश पाच राज्यांमधील वार्षिक पाऊसमानाच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे केंद्राने म्हटले आहे.
जर दैनंदिन पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर असे दिसते की अतिवृष्टीच्या दिवसांची संख्या वाढली व हलक्या तर मध्यम पावसाच्या दिवसांची संख्या कमी झाली आहे, अशी देखील माहिती मोहपात्रा यांनी दिली.
मुसळधार पावसाचे प्रमाण का वाढले?
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले असून त्याचे कारण देतांना त्यांनी म्हटले की, हवामानामध्ये जे काही बदल होत आहेत त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे व उष्ण हवेत जास्त वाढ असल्याने जोरदार पाऊस पडत आहे. त्यासोबतच अरबी समुद्रामध्ये अगोदर पेक्षा जास्त स्वरूपाची चक्रीवादळे होत आहेत.
Share your comments