स्कायमेट ने काही मान्सूनचा दिलासादायक अंदाज वर्तवला होता आता त्यापाठोपाठ भारतीय हवामान विभागाने ही मान्सूनचा अंदाज वर्तवला असून या वर्षी देशातमान्सून साठी अत्यंत पोषक वातावरण असल्याचे जाहीर केले आहे.
या अंदाजानुसार या वर्षी जून ते सप्टेंबर या दरम्यान 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाआहे.या नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याचा अंदाज मध्येपाच टक्के कमी अधिक पाऊस होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.
यानुसार या वर्षी देशात 96 ते 104 टक्के पाऊस होण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचेहवामान खात्याने म्हटले आहे.
.हा अंदाज वर्तवताना भारतीय हवामान विभागाने देशातील 703 जिल्ह्याचा अभ्यास करून अंदाज वर्तवला आहे. गुजरात व राजस्थान ही दोन राज्ये वगळता देशातील सर्वच भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार महिन्यात पडणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी अत्यंतफायदेशीर असल्याचे मानले जाते. त्यामुळे या अंदाजानुसार जर चांगला पाऊस पडलाच तर कृषी आणि कृषीवर आधारित उद्योगांसह सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दिसून येऊ शकते.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पडेल मुसळधार पाऊस
हवामान विभागाने आज वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठीचे भारनियमन थांबवा; नाहीतर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी अंदाज मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. एवढेच नाही तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Share your comments