1. बातम्या

उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या मोबाईल डिझेल पंपला परवानगी; आता शेतकऱ्यांना बांधावर मिळेल डिझेल

कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्याने बदल होत असतात. जसजशी परिस्थिती बदलत जाते तसतशी एकंदरीत व्यवस्थेत आणि स्वतःमध्ये देखील बदल करायला लागतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
indian oil give permition to fisrt mobile disel pump in north maharashtra

indian oil give permition to fisrt mobile disel pump in north maharashtra

 कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्याने बदल होत असतात. जसजशी परिस्थिती बदलत जाते तसतशी एकंदरीत व्यवस्थेत आणि स्वतःमध्ये देखील बदल करायला लागतात.

. ही गोष्ट सगळ्या क्षेत्रांमध्ये लागू होते. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर काळानुरूप बदल  स्वीकारणे आणि आपला व्यवसाय किंवा सेवा जास्तीत जास्त ग्राहकांना समाधानी आणि उपयोगी पडू शकेल याकडे लक्ष देण्याची गरज असते. हेच तत्व लक्षात घेऊन इंडियन ऑईलने एक पाऊल पुढे टाकत शेती आणि वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल घेण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही. आता थेट वस्ती किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर डिझेलचा पुरवठा सुरू करण्यात आला.

नक्की वाचा:बँकांचा आखडता हात! बिनव्याजी मिळणार तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, पण दिलेले उद्दिष्ट बँका पूर्ण करतील का? हा मोठा प्रश्न

उत्तर महाराष्ट्रातील पहिला मोबाईल डिझेल पंप                  

 इंडियन ऑईलच्या या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पहिला मोबाईल डिझेल पंप म्हणून उमराणे ता. देवळा( नाशिक ) येथील मे. देवरे पेट्रोलियम ला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी इंडियन ऑइल चे खास निकष असून त्यानुसार डिझेल टँकरवर तयार केलेला हा पंप थेट शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डिझेल पुरवठा करीत आहे. 

इंडियन ऑईलच्या या उपक्रमाचे परिसरातील शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे. या पेट्रोल पंपाचे संचालक डॉ. लक्ष्मण शंकर देवरे यांनी इंडियन ऑइल च्या धोरणानुसार शेतकऱ्यांना जागेवर डिझेल मिळावी यासाठीहा उपक्रम सुरू केला आहे.आता शेतकऱ्यांना डिझेल घ्यायला पंपावर जाण्याची गरज नसून डिझेल भरलेला टँकरच शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे. एका फोन कॉलने हा टँकर शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध होतो. या उपक्रमाची सुरुवात दहा एप्रिल पासून करण्यात आली. हभप बापू महाराज आळंदीकर यांच्या हस्ते या फिरत्या डिझेल पंपाचे उद्घाटन करण्यात आले.

नक्की वाचा:पिकांच्या उत्पन्नासाठी तसेच जमिनीच्या आरोग्यासाठी ठरतेय ह्युमिक ऍसिड फायदेशीर, या प्रकारे घरी बनवू शकता तुम्ही ह्युमिक ऍसिड

डिझेल पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत डिझेल शेतात जागेवर व वेळेत पोहोच करणेतसेच शेतकरी वाहनधारकांसाठी बांधावर डिझेल साठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून हा पंप इंडियन ऑइल चे निर्देशानुसार सुरू करण्यात आला आहे.

याद्वारे फोन केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात जागेवर डिझेल उपलब्ध करून दिले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे जो काही डिझेलचा दर राहील त्याप्रमाणेच दर आकारला जाणार आहे. बांधावरडिझेल पोहोच केले जाईल त्यामुळे कुठलाही दरवाढ यामध्ये केली जाणार नाही. मापात पाप नाही हे या पंपाचे ब्रीद वाक्य आहे. (स्त्रोत- सकाळ)

English Summary: indian oil give permition to fisrt mobile disel pump in north maharashtra Published on: 14 April 2022, 01:39 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters